लातुरात साकारला पाना-फुलांचा गणपती

लातूर : प्रतिनिधी
पर्यावरण रक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने सौ.केशरबाई पर्यावरणस्नेही मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक पाना-फुलांचा गणपती साकारण्यात आला असून हा गणपती विद्यार्थी, पालक व गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरण आणि परंपरा यांचा मेळ राखत पर्यावरण संवर्धन व संस्कृती जतन या भूमिकेतून माती, पाणी, फुले व पाणी यांच्या सुंदर मिलाफातून आकर्षक व रेखीव पर्यावरणपूरक पाना-फुलांची संदेशमूर्ती तयार करण्यात आली. ज्या निसर्गातून दुर्वा, फुले, अगरडा, बेलपत्र, शमीपत्र इत्यादी पूजा साहित्य वापरतो त्यांचा केवळ वापर न करता त्यांचे संवर्धनही केले पाहिजे या उद्देशाने मंडळातर्फे प्रसाद म्हणून सीडबॉल वाटप करण्यात येत आहे. यातून निसर्ग निरीक्षण व वनस्पती ज्ञान वाढीस लागून गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता निसर्ग शिक्षणाचा उत्सव होऊ शकेल.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहाता ती पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. बाप्पाच्या दशर्नासाठी येणा-या प्रत्येक भाविकांच्या हातात सीडबॉल देऊन त्यातून एक तरी रोपटे रुजावे, हीच अपेक्षा आहे. आज प्रसाद म्हणून दिलेले हे छोटेसे बी उद्या मोठे झाड होऊन निसर्गाला सावली देईल, असे मुख्याध्यापक भीमराव दुनगावे म्हणाले.  या नावीन्यपूर्ण संदेशमूर्तीची संकल्पना व निर्मिती दयानंद वाणीज्य महाविद्यालयाचे प्रा. अजय चव्हाण यांनी केली असून त्यांना याकामी मुख्याध्यापक भीमराव दुनगावे, विलास पांचाळ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. मंडळाच्या या उपक्रमाचे शहरातील पर्यावरण अभ्यासक व पर्यावरण विषयक काम करणा-या संस्थांनी कौतुक केले असून कमलकिशोर अग्रवाल, आशिषची बाजपेयी, शैलेश लाहोटी,  लक्ष्मीरमण लाहोटी आदींनी मंडळाच्या उपक्रमास शुभेच्छा
दिल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news