लातुरात हाणामारी, कोयत्याने हल्ला, एका तरुणाचा मृत्यू

दोघे जखमी, क्षुल्लक कारणावरून हाणामारीचा थरार
लातूर : प्रतिनिधी
येथील कव्हा नाका भागांतील दुर्गादेवी परिसरातील बारमध्ये क्षुल्लक कारणावरून गुरुवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान, एका तरुणाच्या गळ््याला कोयता लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोपान सुग्रीव बोयणे (२१, माताजीनगर, लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. लातूरमध्ये मध्यरात्री हाणामारीचा थरार झाल्याने कव्हा नाका परिसरात तणावाची स्थिती आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दुर्गादेवी परिसरातील एका बारमध्ये गुरुवारी रात्री दारू पित असताना पाय वर का केला, अशा क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर दोन गटांच्या हाणामारीत झाले. या हाणामारीदरम्यान एकाच्या गळयाला कोयता लागल्याने तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

कव्हा तलावाच्या जवळील एका बारमध्ये गुरुवारी रात्री ११.३० वाजता ४ मित्र दारू पित बसले होते. यातील एका मित्राने पाय का वर केला, म्हणून बारमध्ये बाचाबाची झाली. तसेच बारच्या बाहेरही बाचाबाची होऊन दोन्ही मित्रांनी आपल्या जवळच्या मित्रांना बोलावले. त्यामुळे वाद अधिकच वाढला. यात माताजीनगर येथील सोपान सुग्रीव बोयणे (२१) यांच्या गळयावर कोयत्याने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाबा शेख यांच्या फिर्यादीवरून व्यंकटेश डोंगरे, निरंजन काटेकर व इतर तिघा जणांवर विवेकानंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.

तीन पथकांकडून
आरोपींचा शोध सुरू
या घटने प्रकरणी सुमित शेंडगे यांच्या फिर्यादीवरून पंकज पारीख, बाबा शेख व इतर फरार तिघांवर कलम ३०७ नुसार विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय उजगरे हे करीत आहेत. या घटनेच्या तपासासाठी ३ पथके तयार केली असून आरोपींचा शोधही घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news