15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeलातूरलातूरच्या जिल्हाधिका-यांची चौकशी करावी

लातूरच्या जिल्हाधिका-यांची चौकशी करावी

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या जिल्हाधिका-यांनी जन्म दाखल्यासंदर्भाने योग्य पद्धतीने चौकशी न करता बोगस जन्म दाखले प्रकारावर पांघरुन घातले, असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोेमय्या यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी लातूर येथे करुन लातूरच्या जिल्हाधिका-यांची चौकशी करावी, अशी लेखी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  किरीट सोमय्या यांनी राज्यातील बोगस जन्म दाखलाविरोधात मोहीम हाती घेतली आहे. ते राज्यभर वेगवेगळया ठिकाणी जाऊन बोगस जन्म दाखल्यांवर आक्षेप घेत आहेत. त्यांच्या मतानूसार त्यांनी लातूर जिल्ह्यातदेखील कोणताही आाधार नसताना मोठ्या प्रमाणात बोगस जन्म दाखले दिले आहेत. त्याची चौकशी करण्याची आपण मागणी केली होती.
मात्र, या जिल्ह्यामध्ये अशा जन्म दाखल्यांसंदर्भात योग्य पद्धतीने चौकशी झाली नाही. उलट अशा चौकशीवर जिल्हाधिकारी यांनी पांघरुन घातले. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांची चौकशी करावी, असे पत्र मुख्य सचिवाकडे मागणी केल्याचे त्यांनी म्हटले.  जिल्ह्यामध्ये विशेषत: लातूर शहरामध्ये जन्म दाखले देण्यासाठी ठोस पुरावा नसताना तो देण्यात आला. याबाबत चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमला. त्यांनीही चौकशी केली नाही. त्यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला. दरम्यान सोमय्या यांनी सकाळी लातूर शहर महानगरपालिकेत जाऊन आयुक्त व संबंधीत अधिकारी यांची भेट  घेतली.  जन्म दाखल्यांसंदर्भात विचारणा केली. तसेच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, तहसील कार्यालयासही भेट देऊन बोगस जन्म दाखल्यांसंदर्भात चौकशी व्हावी, अशी मागणी केली. एक  महिन्याच्या आत अशी चौकशी होईल, असा विश्वासही सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR