Homeलातूरलातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

लातूर : प्रतिनिधी
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने १६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क करिता २ लाख ५३ हजार रुपयांचे धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, राजेश मित्तल, विजय पस्तापुरे, अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने अभिजीत देशमुख, डॉ. अशोक पोद्दार, महेश मालपाणी, इसरार सगरे आणि विष्णुदास धायगुडे यांनी मान्यवरांचा रोप देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा मांडला. डॉ. अशोक पोद्दार व अभिजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शैक्षणिक सहकार्याबरोबरच वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत शस्त्रक्रिया शिबिराबाबत माहिती दिली. डॉ. संजय शिवपूजे व डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी दिशा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून यशस्वी झाल्यानंतर समाजातील इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात एकूण १६ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. त्यामध्ये रेहान आदम शेख २५ हजार रुपये, श्रीरश बालाजी सावरे, लासुने ज्योती किशन, दिया जालिंदर सुरवसे, बिरादार प्राजक्ता तानाजी, सुमित ज्ञानदेव घोडके, पेठकर अंजली लक्ष्मण, शेख शाबाज शकील, काजी रेहान खालेद यांना प्रत्येकी २० हजार रुपये, ऋतुजा हनुमंत चामे व सदाम जावेद इनामदार यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, शेख जुबेर सलीम ११ हजार रुपये, भूमिका तुकाराम मुंगरे ९ हजार २०० रुपये, साहेबा नूर शेख ६ हजार ३६६ रुपये, त्रिशिकेश हिराचंद गिरी व तनवी सोळुंके यांना प्रत्येकी ५ हजार ७५० रुपये यांचा समावेश आहे. क्रीडा संकुल येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा प्रतिष्ठानचे संचालक तथा नगरसेवक इसरार सगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विष्णुदास धायगुडे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR