24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeलातूरलातूरच्या नाट्य चळवळीला चांगले दिवस : नाट्य समीक्षक अनिल पुरी 

लातूरच्या नाट्य चळवळीला चांगले दिवस : नाट्य समीक्षक अनिल पुरी 

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या नाटय विश्वाला चांगले दिवस येत आहेत. शैक्षणिक लातूर पॅटर्ण बरोबरच आता महाराष्ट्रात लातूरचा नवा सांस्कृतिक पॅटर्ण ही निर्माण होत आहे. लातूरची रंगभूमी आता अधिक सरस आणि प्रतिभावंत होताना जाणवत आहे. लातूर मध्ये आता नव्याने नाटय संस्था निर्माण होत असुन याचा लातूरकर म्हणून मनस्वी आनंद असल्याची भावना नाट्य समीक्षक अनिल पुरी यांनी व्यक्त केली.
रंगकर्मी प्रमोद कांबळे यांच्या पुढाकारातून द स्पेस थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटय संस्थेच्या माध्यमातून विजय तेंडुलकर लिखीत ‘विठ्ठला’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिक रंगभूमीवरही ‘विठ्ठला’ या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. या नाटकाची संहिता पूजन व पोष्टर अनावरण व नटराज पुजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून नाट्य समीक्षक अनिल पुरी, सोनू डगवाले, जेष्ट रंगकर्मी, बाळकृष्ण धायगुडे, सिने अभिनेते अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी. प्रा विजय मस्के,  ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा. शरद पाडे, शुभम सालमे, सतिश गिरी, बालाजी पिंपळे, दस्तगीर शेख, कौस्तूभ जोशी, रुपेश सूर्यवंशी, शिवहार आकुसकर आदी नाट्य कलावंताची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद कांबळे यांनी केले.
…………………….५……………………

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR