लातूर : प्रतिनिधी
अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सराफ सुवर्णकार बांधवांवर तसेच सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिका-यांवर झालेल्या अमानवीय व बेकायदेशीर अटक, धमक्या देणे, मारहाण प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे प्रक्रिया होत आहे. लातूरच्या सराफ व्यापा-यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
लातूर जिल्ह्याच्या सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने अहिल्यानगर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मोहन जाधव रामेगावकर व मुरुडचे सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संतोष दीक्षित, उपाध्यक्ष सावता माळी, संदीप दीक्षित, माजी अध्यक्ष भास्करराव महामुनी, संतोष कोकरे, सुनील दीक्षित, आबासाहेब कुंभार, सिद्धेश्वर दीक्षित, सुनील वेदपाठक, बाळू महामुनी, संदीप दीक्षित, सुनील दीक्षित आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

