लातूरच्या सेवानिवृत्त पोलिस अधिका-याच्या मुलीचा पुण्यात खून!

लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील मूळचा रहिवाशी असलेल्या आणि सद्या पुणे येथे राहत असलेला जावई आकाश बेडगे, सासू गीताबाई बेडगे व नणंद जयश्री साबळे, केदार पाटील, अजिंक्य देशपांडे, नितीन सोमवंशी, आशिष कावळे यांनी संगमताने  आपल्या विवाहित मुलीला पैशासाठी छळ करून तीचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला आहे. आरोपीना तात्काळ अटक करून दोन दिवसात कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालसमोर कुटुंबासह आमरण आत्मदहन करण्याचा इशारा आज काशी लिंगेश्वर नगर, लातूर येथे १९ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत हुंदका भरल्या अवस्थेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांनी दिला आहे.
विष्णू शिंदे यांनी म्हटले आहे कीं, १० जून २०१४ रोजी माझी मुलगी अनुराधा हिचा विवाह रितिरिवाजाप्रमाणे औसा तालुक्यातील नागरसोगा येथील आकाश नामदेव बेडगे यांच्याशी लावून दिला होता. सर्व देणी करून हा विवाह पार पडला. सुरुवातीचे दोन वर्षे सुरुळीत आनंदित चालले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सद्या ते पसायदान सोसायटी, यमुनानगर निगडी येथे प्लॅट नं. १५ मध्ये राहत होते.  ज्या ज्या वेळेस सासरच्यांनी पैसे मागितले त्या त्या वेळेस पैसे दिले. आतापर्यंत ५० लाख रुपये दिले आहेत. जावई जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. अशातच आणि अचानक १ सप्टेंबरला दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान विष्णू शिंदे यांना जावई आकाश बेडगे यांचा फोन आला कीं तुमच्या मुलीने आत्महत्या केलीय. लागलीच शिंदे यांचे सर्व कुटुंबीय पुण्याला गेले. तिथे मुलीचा मृतदेह पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला.
मुलीच्या शरीरावर मारहानीचे व्रण दिसून आले. तिला आधी जिवे मारून नंतर साडीने गळफास देऊन सिलिंग फॅनला लटकावण्यात आलेले स्पष्ट दिसून येत आहे. तिने आत्महत्या केली नसून तीचा शारीरिक व मानसिक छळ करून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप मुलीचे वडील विष्णू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.  माझ्या मुलीचा छळ करून तीचा खून करणा-या तिच्या पतीसह, सासू व नणंद इतर सहभागी आरोपीना गुन्हा दाखल होऊन १८ दिवस झाले तरी फरार आरोपीना अटक करण्यात आलेली नाही. आरोपीना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मयत मुलीचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. अन्यथा दोन दिवसानंतर पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयालासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news