लातूर : प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारच्या शुभमुहुर्तावर दि. ४ ऑगस्ट रोजी लातूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. नुकतेच काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून अभय साळुंके यांची पक्षश्रेष्ठीकडून नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागताच त्यांनी तात्काळ पक्ष कार्याच्या कामाला सुरुवात करावी, अशा सूचना राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्यानंतर सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन कार्यालयात छोटेखानी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करून काँग्रेस पक्षाचे मावळते जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी रितसर पदभार स्विकारला.
या प्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, अॅड. समद पटेल, कल्याण पाटील, एन. आर. पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, अॅड. प्रमोद जाधव, अॅड. बाबासाहेब गायकवाड, सुभाष घोडके, इमरान सय्यद, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, मारोती पांडे, आबासाहेब पाटील उजेडकर, अॅड. अजित बेळकोणे आदी उपस्थित होते. या वेळी प्रदेश कार्यकारिणीत सचिव म्हणून निवड झालेले श्रीशैल उटगे, अॅड. समद पटेल, कल्याण पाटील, एन. आर. पाटील, डॉ. दिनेश नवगिरे यांचाही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पदग्रहण सोहळ्यानंतर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले, त्यागाचा, समर्पणाचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख व काँग्रेसच्या राज्य व केंद्रीय पातळीवरील नेत्यांचे आभार मानत ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली तो विश्वास मी माझ्या कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेन तसेच जिल्ह्यातील काँग्रेसला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी अॅड. प्रमोद जाधव, सुभाष घोडके, सहदेव मस्के, मारुती पांडे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, प्रा. प्रवीण कांबळे, सुरेश चव्हाण, सचिन बंडापल्ले, अॅड. फारुख शेख, अॅड. देविदास बोरुळे पाटील, सोनू डगवाले, युनूस मोमीन, आयुब मणियार, बाळासाहेब देशमुख, गोविंद बोराडे, सुधाकर पाटील, पंकज शेळके, विठ्ठल पाटील, अॅड. नारायण सोमवंशी, अजित निंबाळकर, प्रमोद जोशी, डॉ. गजेंद्र तरंगे, व्यंकटेश पुरी, अमित जाधव, अॅड. विजय गायकवाड, कलीम शेख, बालाजी साळुंके, महेश काळे, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, अजित नाईकवाडे, संजय ओहळ, आसिफ बागवान, सिकंदर पटेल, मुकेश राजमाने, अविनाश बट्टेवार, विकास वाघमारे, बालाजी साळुंखे, विजय टाकेकर, पवन बनसोडे, राजू गवळी, अनिल पाटील, इब्राहिम शेख, रमेश सूर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, शीतल मोरे, करुणा शिंदे, भाऊसाहेब भडीकर, पवन गायकवाड, ख्वॉजापाशा शेख, जहीर शेख, युनूस शेख, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, अक्षय मुरुळे, पिराजी साठे, बालाजी गवळी, गिरीश ब्याळे, सत्यवान कांबळे, कुणाल वागज, फारूक शेख, नितीन कांबळे, राजू गवळी, अॅड. गणेश कांबळे, युसूफ सय्यद, आसिफ मणियार, करीम तांबोळी, बब्रुवान गायकवाड, शकील पटेल, महेश देशमुख, प्रा. रमेश मदरसे, धनाजी चांदूर, अपराजित मरगणे, विकास पाटील, मदन बिरादार, श्रीकांत साळुंके, अमोल नवटके, माधवराव पाटील आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर इमरान सय्यद यांनी आभार मानले.

