लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच स्थानिक पातळीवर पक्षकार्य अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नुतन पदाधिकारी यांना काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
यामध्ये रेणापुर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नितीन अनुरथ मोटेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेणापुर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित गोविंद गिरी यांची निवड करण्यात आली. मुरुड बु. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. सारिकाताई निलेश फेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, जि. प. चे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा शीलाताई पाटील राजूरकर, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष निलेश देशमुख, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे, महिला काँग्रेस लातूर तालुका अध्यक्ष ज्योतीताई शिंदे, लातूर ग्रामीण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत पाटील, जि.प. सदस्य दत्ता टेकाळे, लातूर पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण माजी युवक काँग्रेस अध्यक्ष लातूर ग्रामीण विधानसभा रघुनाथ शिंदे, नगर पंचायत रेणापूरचे गटनेते गजेंद्र चव्हाण, नगरसेवक सचिन मोठेगांवकर, पदम पाटील, अजय चक्रे, रहीम पठाण, केशव माने, अॅड. महेश राजे, अवधूत कातळे, प्रदीप काळे, चेतन एकुरके, उमेश हुडे, शिवाजी अकनगिरे, भीमाशंकर कोरे, अमित पाटील, सुरज वंगाटे, ज्ञानेश्वर पाटील, रमेश राठोड, मदन पांचाळ आदींची उपस्थिती होती.

