लातूर : प्रतिनिधी
आगामी राजकीय घडामोडी व संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने लातूर जिल्हा काँग्रेसची बहुप्रतिक्षित नवीन कार्यकारणी अखेर अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने तसेच काँग्रेसचे विधिमंडळ मुख्य प्रतोद व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी कार्यकारणी गठीत करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. या नव्या कार्यकारणीत संघटना बळकट करण्यासाठी अनुभवी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबतच युवा चेह-यांना संधी देऊन सर्वसमावेशक समतोल साधण्यात आला आहे.
जाहीर झालेल्या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी तानाजी फुटाणे, गंगासिंग कदम, गोविंद बोराडे, विलासराव पाटील, मारोती पांडे, प्रभाकर बंडगर व दत्तोपंत सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदाची धुरा वैजनाथ लुल्ले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटनात्मक कामात महत्त्वाचा दुवा असणा-या सरचिटणीस पदावर गोपाळ भंडे, सतिष शिंदे, रघुनाथ शिंदे, जयंत गणपतराव कुलकर्णी, आबासाहेब पाटील उजेडकर, पंकज शेळके, अॅड. अजित बेळकोने विळेगावकर, चंद्रकांत मदे, माधव कोळगावे, विजयकुमार चवळे, मेहताब बेग, सचिन पाटील आणि माधवराव सर्जे यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय सचिव पदाची जबाबदारी फरमान हसनसाब शेख, निर्गुन शंकरराव साळुंके, महेश भालचंद्र अन्नदाते, महेंद्र मुळे, राम भंडारे, सुरेंद्र धुमाळ, दिनकर बिराजदार, महेश तिवारी, अशोक कोरे, मालबा घोनसे, अनिल पाटील, राम कांबळे, रमेश धर्माधिकारी, दिनकर कदम, दाऊद नबीसाब बागवान, उमाकांत नरवाडे, लक्ष्मण बतले, संदीप पाटील, ज्ञानोबा गोडभरले, ज्ञानेश्वर भांगे, अॅड. दीपक राठोड, माजिद काझी आणि प्रकाश मिरगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर पक्षाचे विचार व ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटकपदी अनिल बबुवान पवार, ईश्वरप्रसाद विष्णुदासजी चांडक, अनंत चव्हाण, अॅड. अजित माकणे, संतोष पाटील, विकास महाजन, रामेश्वर बिरादार, विरभद्र आग्रे, संजय बिराजदार, अंबादास गणुचे पाटील व अनिल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी सर्व नूतन पदाधिका-यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाची सर्वसमावेशक विचारधारा, लोककल्याणकारी भूमिका आणि जनहिताचे मुद्दे घेऊन ही नवी फळी जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करेल, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. सर्व नूतन पदाधिका-यांनी आपापल्या भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केले असून संपूर्ण जिल्ह्यातून नव्या पदाधिका-यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















