लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या लातूर जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बैठकीत २०२६-२७ या कालावधीसाठी सर्वानुमते ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये जिल्हाध्यक्षपदी इंजि. शैलजा कारंडे, कार्याध्यक्षपदी प्रो.डॉ. रामचंद्र पस्तापुरे, उपाध्यक्षपदी डॉ. नयन राजमाने यांची निवड करण्यात आली. संघटन मंत्री प्रा. डॉ. बालाजी भंडारे, सहमंत्री उषा भोसले, कोषाध्यक्ष डॉ. प्रणिता चाकूरकर, कार्यालय प्रमुख उमेश सेलुकर, लोकसाहित्य कार्य प्रा. डॉ. विजयकुमार ढोले, बालसाहित्य कार्य वृषाली पाटील, युवा साहित्यिक प्रतिनिधी म्हणून देवांश बालाजी पाचंगे, प्रचार व समाज माध्यम प्रमुख म्हणून डॉ. रामशेट्टी शेटकार यांची निवड करण्यात आली.
महिला साहित्यिक प्रमुखपदी अश्विनी निवर्गी यांची निवड केली आहे. मार्गदर्शक म्हणून मा. प्रवीणजी सरदेशमुख व प्रा. डॉ. सुनिता सांगोले. या निवडीबद्दल साहित्य भारतीचे प्रांत महामंत्री युवराज नळे, प्रांताचे नितीन केळकर, शशिकांत घासकडबी, प्राचार्य संजीव गीरासे, डॉ. सर्जेराव जिगे, उमेश काळे, डॉ. रविंद्र बेंम्बरे, डॉ. नरेंद्र पाठक आदींसह साहित्य भारती परिवाराच्या वतीने नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.
















