लातूर: प्रतिनिधी
माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात भव्य मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध १३ केंद्रांवर हे शिबिर पार पडणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
लातूर जिल्हा बँकेने नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आपली बांधिलकी जपली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या वयानुसार निर्माण होणारे दृष्टीदोष आणि मोतीबिंदूच्या समस्यांवर वेळीच उपचार व्हावेत, हा या मागचा मुख्य हेतू आहे.
१८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून खालील ठिकाणी ही शिबिरे सुरू होतील. लातूर ग्रामीण: ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव, सार्वजनिक स्टेज सभागृह, बोरगाव काळे, लातूर शहर: माता रमाई आंबेडकर रुग्णालय, सम्राट चौक लातूर, पांडुरंग मंगल कार्यालय, दीपज्योतीनगर लातूर, बाजार समिती सभागृह, रेणापूर, यादव मंगल कार्यालय, बेलकुंड, ता. औसा, जिजाऊ चौक, निलंगा, बिराजदार नेत्र रूग्णालय, शाहू चौक उदगीर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, तिरुका, ता. जळकोट, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय, चाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसर शिरूर अनंतपाळ बोरोळ चौक, देवणी या ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत.
नागरीकांनी सदरील शिबाराचा लाभ घेण्यासाठी पुढील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधाव. लातूर ग्रामीण: ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, अॅड. राजकुमार आबासाहेब पाटील ७५८८०६२९७३, गोविंद शेषेराव देशमुख ९४२२४७१३२८, सार्वजनिक स्टेज सभागृह बोरगाव काळे, ता. लातूर दीपक काळे ९५०३०५९१११, सतिश काळे ९८६००१०४७४, माता रमाई आंबेडकर रुग्णालय, सम्राट चौक, लातूर, अॅड. किरण जाधव ९८२३४९६०००, विजयकुमार साबदे ९०४९०२५०००, पृथ्वीराज सिरसाठ ७०६६९०१०८३, पांडुरंग मंगल कार्यालय, दीपज्योतीनगर, लातूर
पवन सोलंकर ७०२०८२४८२८, सपना किसवे ९४२२६१११००, बाजार समिती सभागृह, रेणापूर अॅड.प्रमोद चंद्रकांत जाधव ९०४९९५१०००, प्रमोद बाळासाहेब कापसे ९८५०००७३०४, यादव मंगल कार्यालय, बेलकुंड ता. औसा शामबापू भोसले ९६२३३५६१११, सचिन पाटील ९४२१०९५५३५, सईताई गोरे ९९२२२२२२५५, जिजाऊ चौक, निलंगा अभय साळुंके ९८५०७९१९९९, विजयकुमार पाटील ९९६०८८८९०३, अजित नाईकवाडे ९९७०६०३११११, बिराजदार नेत्र रूग्णालय, शाहू चौक, उदगीर कल्याण पाटील ९९२३१००९२४, संतोष बिराजदार ९६८९२९५४४१, विठ्ठल रुक्मिीणी मंदिर सभागृह, तिरूका ता. जळकोट, मारूती पांडे ९९२२३९७४६८, ग्रामीण रुग्णालय, अहमदपुर चंद्रकांत मद्दे ९४२३०७७५४९, निलेश देशमुख ९४२१३५८६३५, ९३०९८३८७५७, ग्रामीण रुग्णालय, चाकुर ता. चाकुर एन. आर. पाटील ९८२३९५५०००, अनिल चव्हाण ९४२२३७१७१७, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिरुर अनंतपाळ अनुप शेळके ९९२३३२३९९९, आबासाहेब पाटील ९५७७८३९९९९, बोरोळ चौक,
देवणी दिलीप पाटील नागराळकर ९४२०३५९९९९, अॅड. अजित बेलकोने ९०१११६७७७५, औदुंबर पांचाळ ९७६३४००४४०. तसेच शिबिरा बाबतची अधिकची माहितीसाठी शिबिराचे समन्वयक डॉ. दिनेश नवगिरे ९९७०९९९६६३ यांचेशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात येणे अनेकदा शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. लातूर जिल्हा बँकेच्या वतीने सर्व शाखा आणि स्थानिक पदाधिका-यांमार्फत या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या शिबिर केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेच्या संचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

