लातूर जिल्ह्यात सरासरी ५६.४५ टक्के मतदान

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५ -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सर्व ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात सुमारे ५६.४५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनीही शहरातील भगवान प्राथमिक विद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजाविला.
महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत ५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यातील मतदारांपैकी १३ हजार ७५३ मतदारांनी म्हणजेच ३४.६४ टक्के मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख कन्या शाळा येथील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यावेळी उपस्थित होत्या. सायंकाळी ४ वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यातील ३९ हजार ७०३ पदवीधर मतदारांपैकी सुमारे २२ हजार ४१२ मतदारांनी म्हणजेच ५६.४५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news