लातूर : सिध्देश्वर दाताळ
मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊसाने हजेरी लावली होती. गतवर्षाच्या तूलनेत यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या आधारे शेतक-यांनी उत्साहात खरीप हंगामाची तयारी केली होती. त्यानुसार लातूर तालुक्यातील सुमारे ८५ ते ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवली असून, शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस गायब झाल्यामुळे शेतक-यांची आता चिंता वाढली आहे.
गेल्या पंधरा दिवपासून वातावरणात कधी उकाडा तर कधी पाऊसाचे वातावरण तयार होण्याचे प्रमाण वाढले असून ढगफुटी तर दूरच, पण एखादी सरी देखील आली नाही. यामुळे शेतीतील आहे तो ओलावा आता कमी होत चालला आहे. तालूक्यातील अनेक शेतक-यांनी बाजारातून चागल्या प्रतिचे बी खरेदी करून पेरणी केली आहे. मात्र गेल्या काहि दिवसापासून पाऊसाने उघडीप दिल्याने बी उगवण्यासाठी आणि अंकुर टिकवण्यासाठी आवश्यक असलेली आर्द्रता कमी पडत आहे. तालूक्यातील ८५ ते ९० टक्के क्षेत्र शेतक-यांनी पेरणी केली आहे. मात्र सध्या शेतक-यावर आता संकट कोसळले आहे.
गतवर्षांत कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकयांना खरीप हंगामात आलेले पीक अपेक्षित उत्पन्न देऊ शकले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले, तरीही यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतक-यांनी -हदहयावर दगड ठेवून मृग नक्षत्रात सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद या पिकाची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे काहि भागातील शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली.
तालूक्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नैसर्गिक पावसावरच त्यांचा संपूर्ण भर असतो. काहींनी विहिरी किंवा बोअरच्या पाण्यावर ठिबक, सिंचन सुरू केलं असलं तरी ते फार काळ पुरणार नाही, अशी स्थिती आहे. ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर आहेत त्या त्या शेतक-यांनी पेरलेली बियाणे उगवण्यासाठी काळजीपूर्वक स्प्रिंकलरने व रेणापाईपने पाणी देण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात खरीप २०२५-२६ या हंगामात सोयाबीन ६३१३१ हेक्टर क्षेत्रापेक्षा ५०७४२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तूर २३५२.६ हेक्टर क्षेत्रापेक्षा १४१४ हेक्टरवर, उडीद १८७.६ हेक्टर क्षेत्रापेक्षा १९० हेक्टरवर, मूग ४३२.८ हेक्टर क्षेत्रापेक्षा ३६० हेक्टरवर आदींसह तालुक्यात ८५ ते ९० टक्के पेरणी पूर्ण झीली असल्याचे दि. २६ जून रोजीच्या अवालानुसार पी. जी. राठोड तालूका कृषी अधिकारी यांनी सागीतले.