26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeलातूरलातूर मनपा निवडणुकीत ‘जी-२४’ संघटनेचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर

लातूर मनपा निवडणुकीत ‘जी-२४’ संघटनेचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर

लातूर : प्रतिनिधी
फुले- शाहू -आंबेडकर विचारधारेवर काम करणा-या ‘जी-२४’ या परिवर्तनवादी विचाराच्या संघटनेची बैठक दि. २५ डिसेंबर रोजी येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ‘जी-२४’ ने पाठींबा जाहीर केला.
यावेळी लातूर शहर महानगरपालिकेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक यासंदर्भात ‘जी-२४’  या संघटनेचे काय भूमिका असायला हवी याबाबत चर्चा घडवून आणण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी एक मताने ‘जी-२४’  परिवर्तनवादी संघटना पुरोगामी विचाराचे असून फुले शाहू आंबेडकर विचार धारेला मानणारी असल्यामुळे या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाठिंबा काँग्रेस पक्षाच्या बाजूने असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापूर, नरसिंग घोडके, आदिवासी नेते रामराजे आत्राम, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. अशोक नारनवरे, अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. आर. वाय्. शेख, लसाकामचे शिरीष दिवेकर आणि राजकुमार नामवाड, डॉ.ह्याणेश गोमारे, बरकत काजी, श्रीधरराव शेवाळे, प्रताप माने पाटील, भाई दत्ता सोमवंशी, अ‍ॅड. सोमेश्वर वाघमारे, अ‍ॅड.  दीपक साठे, शिवाजी नरहरे, डॉ. असद खान पठाण, अ‍ॅड.  बशीर शेख, अ‍ॅड. ए. एन. भोसले, प्रा. संगमेश्वर पानगावे, अ‍ॅड. सुरेश शिंदे, नारायण कांबळे भागवत कारंडे, बी. बी. सिरसीकर, डी. एस. सूर्यवंशी, श्रीकांत मुद्दे, खंडेराव भोजराज इत्यादी सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR