लातूर : प्रतिनिधी
ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार मंथन-२०२५ या सहकार परिषदेत लातूर मल्टीस्टेटच्या यशाच्या प्रवासात आणखी एक गौरवशाली क्षण जोडला गेला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेसाठी संस्थेला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड-२०२५’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित या सहकार परिषदेत सहकार आयुक्त दीपक तावरे आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल्य कोरे व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा सन्मान आमच्या सभासद, ग्राहक व कर्मचारी वर्गाने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. या गौरवामुळे अधिक जबाबदारीने आणि नव्या उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा आम्हा सर्वांना मिळाली आहे. सहकार मंथनच्या उद्घाटनास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची उपस्थिती होतीÞ पुरस्काराचे वितरण मॅनेजमेंट कॉसमॉस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष सीए.मिलिंद काळे व महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलाÞ लातूर मल्टीस्टेटच्या या यशाबद्दल सामाजिक सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहेÞ.

