16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeलातूरलातूर शहरातील १४७३ जन्म प्रमाणपत्र रद्द 

लातूर शहरातील १४७३ जन्म प्रमाणपत्र रद्द 

लातूर : प्रतिनिधी
नायब तहसीलदार, लातूर यांच्या स्वाक्षरीने एकूण १ हजार ४७३ आदेश लातूर शहर महानगरपालिकेस प्राप्त झाले होते व याप्रमाणे एकूण १ हजार ४७३ विलंबाने नोंदीचे जन्मप्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. तसेच विलंबाने नोंदणीचे ११८ मृत्यू प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली होती. सदरील १ हजार ४७३ जन्म-प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेली आहेत.
शासनाने दिनांक ११ ऑगस्ट २०२३ पासून उशीरांनी नोंदणीबाबतच्या आदेशाविषयी २१ जानेवारी २०२५ च्या स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यापेक्षा कमी दर्जाचे अधिकारी अर्थात नायब तहसीलदार  यांनी दिलेल्या देशाच्या आधारे निर्गमित करण्यात आले आहे ते आदेश व संबंधित प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत. उर्वरित संबंधीत १ हजार १५४  नागरिकांनी त्यांची जन्म प्रमाणपत्रे रद्द झालेली आहेत याची नोंद घ्यावी व सदरील जन्मप्रमाणपत्रे जरी इतर कार्यालयात जमा केली असतील तरी ती वापस काढून घेवून जन्म-मृत्यू विभाग लातूर शहर महानगरपालिका येथे तात्काळ जमा करावीत व अनुपलब्धता प्रमाणपत्रासाठी व जन्म प्रमाणपत्रासाठी नव्याने अर्ज करावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR