लातूर : प्रतिनिधी
जागतिक सायकल दिन लताूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने दि. ३ जून रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेहमीप्रमाणे लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने पर्यावरण पुरक व समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले. तसेच क्लबच्या २५ सदस्यांनी रक्तदान केले.
सायकलला एक साधे, परवडणारे, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल शाश्वत वाहतुकीचे साधन म्हणून जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्लबच्या जवळपास ७० ते ८० सभासदांनी सायकल रॅलीत भाग घेतला होता. लातूर सायकलिस्ट क्लब नेहमीच पर्यावरण पूरक व समाज उपयोगी काम करण्यास नेहमीच अग्रेसर असतो. सायकल हे वाहन सहिष्णुता, मानवता यांचे प्रतीक आहे, असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे, असा संदेश यानिमित्ताने दिला जातो. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. मंगळवारीही या पर्यावरण पूरक जागतिक सायकल रॅली निमित्त सायकल रॅली काढून हे दाखवून दिलेले आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त येथील अंबाजोगाई रोडवरील हॉटेल वृंदा येथे समाज उपयोगी कार्य म्हणून क्लबच्या २५ सदस्यांनी रक्तदान केले आहे कारण रक्तदान हेच श्रेष्ठदान तसेच जागतिक स्तरावरील पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न वाढत असल्याने सायकल चालवून हवेचे प्रदूषण कमी करण्याचा जागतिक पातळीवरील महत्वाचा संदेश या दिवशी दिला गेला. जागतिक तापमान वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्लब वृक्षारोपण सुद्धा करण्यात येते.
मंगळवारी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगते नंतर क्लबचे सदस्य महेश तोंडारे यांनी अल्पोपहाराचे आयोजन केले होते. रॅलीचे आयोजन, नियोजन हे सर्व क्लबचे अध्यक्ष श्रावण उगले, उपाध्यक्ष प्रतापसिंग बिसेन व सचिव श्रीरंग मद्रेवार सावकार यांनी व लातूर सायकलिस्ट क्लबच्या सर्व सदस्य यांनी केले होते.