किल्लारी : वार्ताहर
श्रावणाच्या पवित्र महिन्यात श्रावण सोमवारी गाय काय कापल्याचा संतापजनक प्रकार किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लामजना गावात घडला याबाबत चार जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
लामजना येथील सन लाईट बारच्या जवळ रफिक सलीम लाडले खान यांनी वीटभट्टीवरील मजुरांसाठी राहण्यासाठी पत्र्याचे शेड बनवले आहे. या शेडमध्ये अंदाजे दोनशे किलो प्राण्याचे मास (ज्याची किंमत दोनशे रुपयांप्रमाणे चाळीस हजार रुपये) व एक तांबड्या रंगाची कलवड (ज्याचे वय नऊ महिने) बाजूला बांधलेली होती. त्याची किंमत चार हजार रुपये आहे. एकूण ४४ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्याप्रमाणे त्यांनी सदर शेडवर धाड टाकली.
या प्रकरणी शाहीर अन्वर बिरादार वय २८, जावेद लाडले साब लाडखां वय ३४, जुबेर शकील बिरादार वय २३, अब्दूल्ला मुश्ताक बिरादार २७ सर्व राहणार लामजना यांच्यावर महाराष्ट्र प्राणी अधिनियम १९७६ सी आर नंबर २२६/२०२५ कलम ५,५(अ)(१),५(ब)५(सी)९,९ प्रमाणे पोलिस कॉन्स्टेबल बालाजी शिवाजी लटूरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी साहायक पोलीस उपनिरीक्षक विशाल शहाणे यांनी तत्परता दाखवत सर्व आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. या कामात मुरलीधर दंतरावर या पोलीस कर्मचा-याने मोलाची भूमिका बजावली.

