‘लालपरी’ उत्पन्नात ६६ कोटींची वाढ; रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीचे विक्रमी उत्पन्न

मुंबई : प्रतिनिधी
जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. आगामी काही महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

एसटीचे प्रत्येक आगार हे त्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला प्रवासी सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत याकडे अपेक्षित लक्ष न देता लांब पल्ल्याच्या, तुलनेने अनुत्पादक फे-यांवर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती. मागील महिन्यात उत्पन्नवाढीचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही बाब स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली होती.

ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफे-यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फे-याही वाढविण्यात आल्या.

विविध उपाययोजनांसह रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे, एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. सध्या एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची ‘हनुमान उडी’ घेत एसटीने विक्रमी उत्पन्न मिळवले. प्रवाशांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन बसफे-यांचे करण्यात आलेले नियोजन यामागील प्रमुख कारण ठरले आहे. ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळवले आहे. उत्पन्नवाढीचा हा कल कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून निघण्याची शक्यता आहे. ‘जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या बदलांचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर दिसून आला आहे.

 

अर्थशास्त्रातील ‘मागणी तसा पुरवठा’ या मूलभूत तत्त्वाचा अवलंब करत ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गांवर बसफे-या वाढविण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

अधिक फे-या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र
दरम्यान, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गरजेनुसार एसटीची सेवा पोहोचली पाहिजे. अनुत्पादक फे-यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फे-या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे. ऑगस्ट महिन्यात झालेली ६६ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ ही योग्य दिशेने सुरू झालेल्या बदलाचे द्योतक आहे. भविष्यातही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन केले, तर एसटीला किमान तोटा होणार नाही, इतके उत्पन्न दर महिन्याला मिळविणे शक्य होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news