लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने लातूर येथील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करून एक आदर्श सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मंगळवार, दि. २६ मे रोजी सकाळी सर्वप्रथम विलास सहकारी साखर कारखान्याच्या स्थळावर लोकनेते विलासराव देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.  या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखाना स्थळावरील अभिवादन कार्यक्रमानंतर मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
विलास साखर कारखान्याने नेहमीच व्यावसायिक यशासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवली आहे, या अन्नधान्य वाटप उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी कारखान्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसुल पटेल, तात्यासाहेब पालकर,  हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दीपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने व रमेश देशमुख यांच्यासह कारखान्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news