लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी अॅड. प्रमोद जाधव, एन. आर. पाटील, अशोक गोविंदपुरकर, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, मारुती पांडे, अनुप शेळके, संचालिका स्वयंप्रभा पाटील, अनिता केंद्रे, हनुमंतराव जाधव, प्रा. शशिकांत कदम, प्रभाकर केंद्रे, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने शासकीय रुग्णालयात फळांच्या ८०० बॅग वाटप करण्यात आल्या.
















