लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरांमध्ये बहुतांश सर्व समाज सुधारकांची स्मारके उभारली गेली आहेत. परंतु, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सर्व समस्यांची सोडवणूक माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करून त्याची उभारणी आगामी वर्षभरामध्ये करण्याची हमी महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिली आहे.
शहरात लोकमान्य टिळक चौक येथे दि. २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १७० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानावरून बोलत होत्या. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी, लातूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृहनेते विजयकुमार साबदे, नगरसेवक प्रवीण कस्तुरे, प्रेरणा होनराव, अॅड. दीपक मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक लोकमान्य टिळक विचार मंचचे अध्यक्ष संजय निलेगावकर यांनी केले तर आभार लोकमान्य टिळक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीनिवास फडणीस यांनी केले. या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक विचार मंचचे सर्व पदाधिकारी, उत्तराधी मठाचे रघुत्तमाचार्य जोशी, प्रसाद उदगीरकर, मनोज जोशी, वामन पाठक, विष्णू आष्टीकर, वीरेंद्र पाटील, भानुदास भातांबरेकर, सचिन दिवाण, किरण कुलकर्णी, विवेक हाडगेकर, शुभम कुलकर्णी, अॅड. मातोळकर, महेंद्र जोशी, दगडुप्पा मिटकरी, भालचंद्र सोनकांबळे, वसंत भेंडे, डॉ. रवी पोरे, शिवकुमार क्षीरसागर, संजय सूर्यवंशी, अतुल कुलकर्णी, संजय समुद्रे, अमित सौंदत्ती, योगेश उन्हाळे, बाळू घाटगे, विनोद मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
















