मेहकर(बुलडाणा) : विशेष प्रतिनिधी
समस्त मातंग समाजातील बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पुष्पहार अर्पण व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन नगरसेविका मंगला सुरेश मानवतकर यांनी आणि माजी नगरसेवक निलेश सुरेश मानवतकर यांनी केले आहे.
पत्रकानुसार शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ, मेहकर. येथे सर्व मातंग समाजातील नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन नगरसेविका मंगला सुरेश मानवतकर यांनी आणि माजी नगरसेवक निलेश सुरेश मानवतकर यांनी केले आहे.
















