‘लोकशाहीसाठी मार्च’

मतचोरीचे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गत काही दिवसांपासून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या निदर्शनानंतर सोमवारी हे संपूर्ण प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात पोहोचले. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात आणि कडेकोट बॅरिकेड्स तोडत सर्वोच्च न्यायालयापर्यंत ‘लोकशाहीसाठी मार्च’ काढला. या मोर्चादरम्यान विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेतील कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा आणि त्यात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. भगवान दास रोडवर पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते वाहनावर चढले आणि बॅरिकेड्स पार करून पुढे गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना राजीनामा देण्याचे आणि ‘माफीचा साक्षीदार’ बनण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुमच्याकडून चूक झाली आहे, पण यामागचे खरे सूत्रधार वेगळे आहेत.

हा लढा इथेच थांबणार नाही. दिवस असो किंवा वर्ष, आमचा संघर्ष सुरूच राहील. निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, मतदार याद्यांमधील त्रुटी आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेवरून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्या आहेत. न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करून यावर येत्या २७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधु आणि विवेक जोशी यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवण्यात आले आहे. विरोधी पक्षांचे प्रमुख नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, संजय राऊत, सुप्रिया सुळे, एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माझी, सौगत रॉय आणि ई. टी. मोहम्मद बशीर या ११ प्रमुख नेत्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. तत्पूर्वी, ‘मतचोरी’च्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयात या मुद्यांशी संबंधित प्रकरणे आधीच न्यायप्रविष्ट असल्याने ही भेट नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोर्चात काँगे्रसचे सचिन पायलट, शशी थरूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुकू, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, योगेंद्र यादव उपस्थित होते. दिल्ली पोलिसांच्या मनात नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही. ही संपूर्ण परिस्थिती पाहता, देश आणीबाणीच्या दिशेने चालला आहे की काय, अशी भीती आणि भावना आज अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. देशात पारदर्शक निवडणुका झाल्याच पाहिजेत. ज्ञानेश कुमार यांनी नैतिकतेच्या आधारावर त्वरित राजीनामा दिला पाहिजे, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. अनेक राजकीय आंदोलनांचे साक्षीदार असलेले दिल्लीतील जंतरमंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण दिल्ली पोलिसांनी आता यादीतून वगळले असून, राजधानीत आंदोलन करण्यासाठी तीन पर्यायी ठिकाणे जाहीर केली आहेत.

त्यामुळे आता जंतरमंतरवर धरणे किंवा आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. गृह मंत्रालयाच्या एका अधिकृत आदेशानुसार आंदोलनासाठी तीन नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मागील काही महिन्यांत झालेल्या सलग आंदोलनांमुळे सरकारी यंत्रणांचे केंद्र असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्यात वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार आता आंदोलने आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुराडी ग्राऊंड आणि सीबीडी ग्राऊंड (पूर्व दिल्ली) या तीन नवीन जागांची घोषणा करण्यात आली आहे. जंतरमंतर हे निदर्शनांसाठी बंद करण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी (१३ ऑक्टो.) सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तयारी दाखवली आहे. जंतरमंतर हे निदर्शनांचे अधिकृत ठिकाण रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करताना अभिजित दिपके म्हणाले, पंतप्रधान मोदी एक दिवस लोकशाहीच रद्द करतील आणि संपूर्ण देशच जंतरमंतर बनून जाईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news