पाथरी : जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीच्या संघाने दिमाखदार विजय संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयामुळे लोणी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे खेळाडू कै. मारोतराव धर्मे क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत. संघातील खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, सांघिक भावना आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा विजय मिळवला.
या विजयी संघात कॅप्टन प्रणव भुंबे, अशोक काळे, वरद धर्मे, नारायण कदम, यश धर्मे, अश्विन धर्मे, शाम अवचार, अथर्व लोंढे, मयुरेश रायपल्लेवार, जगदीश धर्मे, आरुष धर्मे, वेदांत गिराम, अथर्व वाघमारे, पंकज पुरी, अवधूत फुके या खेळाडूंचा समावेश होता. संघाला राज्यस्तरीय खो-खो प्रशिक्षक महेंद्र नाना धर्मे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे खेळाडूंना नवी ऊर्जा आणि विजयाची प्रेरणा मिळाली.
या स्पर्धेसाठी रामप्रसाद धर्मे, विकास धर्मे, गणेश धर्मे, नवनाथ सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी सर्व विजयी खेळाडू व प्रशिक्षक महेंद्र नाना धर्मे यांचे अभिनंदन केले आहे.
















