32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeलातूरवंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपळ फाटा येथे रास्ता रोको

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपळ फाटा येथे रास्ता रोको

रेणापूर :  प्रतिनिधी
रेणापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर झाला असून दुष्काळाच्या अनुषांगाने उपाय योजना करण्यात याव्यात शेतक-यांंना सरसकट पिक विमा  देण्यात यावा ,  बँकेने  शेतक-याला दिलेले पिक कर्जाची वसुली त्वरीत थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी रेणापूर तालुका  वंचित बहुजन आघाडीच्या रविवारी दि ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता १ तास लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर ंिपपळ फाटा चौकात रास्ता रोका आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून अव्वल कारकुन तुकाराम जाधव व पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे यांनी आंदोलन स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्वीकाले.
महिला बचत गटाला विविध बँकामार्फत देण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, आगामी निवडणुका बेलेट पेपरवर घेण्यात याव्यात,  शहरी व ग्रामीण हा भेदभाव न करता घरकूल योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतका-यांना मोफत सातबारा उतारा देण्यात यावा, विद्यार्थ्यांची शैक्षणीक फीस माफ करण्यात यावे. ंिपपळफाटा येथे  अवैध वाहतूक बोकाळली असून या वहातुकीला  शिस्त लावण्यात यावी. वृध्द कलाकारांची बैठक घेऊन समाज कल्याण मार्फत मानधन त्वरीत मंजूर करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महासचिव रोहित सोमवंशी, युवा जिल्हा महासचिव नितीन गायकवाड, तात्याराव वाघमारे, युवा रेणापूर तालुकाध्यक्ष कृष्णकांत वाघमारे, भरत मामडगे, खय्युम शेख ,विशाल मस्के, उत्तम ढगे, गौतम आचार्य, अहमद शेख, प्रकाश कांबळे, बाबासाहेब पवार, तात्याराव धावारे राजू चव्हाण, सुशील कांबळे, अनुराधा वाघमारे, रामराव फुंदे, गीता पवार, कमल सरवदे, बालिका कांबळे, अख्तर बी शेख, सावित्री पवार, सुरेखा साखरे, उर्मिला सोमासे, मीना घुले, रेखा शेटे, रेणुका पवार, अश्विनी पवार, शोभा पवार, सावित्रीबाई वाकडे, सत्यशील वाकडे, प्रेमा सोमासे, ज्योती हनवते, रामदास ससाने, वैजनाथ गायकवाड आदी सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR