16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeलातूरवाघोली येथे वाहनाच्या धडकेत बहीण-भाऊ जागीच ठार

वाघोली येथे वाहनाच्या धडकेत बहीण-भाऊ जागीच ठार

औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील वाघोली येथील शिंदे कुटुंबावर काळाने घाला  घातला असून दुर्दैवी अपघातामध्ये पद्माकर शिंदे यांचा मुलगा आणि मुलगी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले आहेत . वाघोली येथील प्रसाद पद्माकर शिंदे आणि गायत्री पद्माकर शिंदे हे बहीण भाऊ वाघोली येथून लातूरकडे दुचाकीवरून  जात असताना औसा येथील नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर देवयानी साडी सेंटरच्या समोर आले असता बोलेरो गाडीने त्यांना जोराची धडक दिली यात दुचाकी खाली पडली .यावेळी पाठीमागून ट्रकने या दोन्ही बहिण भावास चिरडून निघून गेले. या आपघात  शिंदे बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला  असल्याची माहिती औसा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रेवणनाथ ढमाले यांनी दिली . ही घटना मंगळवार दि. ७  ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
मृताचे वडील  पद्माकर शिंदे हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. मुलगी गायत्री ही लातूरमध्ये दयानंद महाविद्यालयात फँशन डिझाईनच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत होती तर प्रसाद वडिलांना शेती आणि दुधाच्या कामात मदत करत होता. पद्माकर शिंदे यांची ही दोनच अपत्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची बातमी कळताच वाघोली गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दोन्ही प्रेत देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोघांचाही वाघोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण वाघोली गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR