लातूर : प्रतिनिधी
उन्हाळा सुरु झाला की, लोक घर आणि पिण्याचं पाणी कसं थंड ठेवता येईल याचा विचार करतात. या दिवसात थंड पाणी शरीराला खूप आराम देतं. पण ते थंड पाणी फ्रीजमधील आहे की अजून कोणतं हेही तितकंच महत्व.ां आहे. उन्हाळ्यात बहूतांश लोक मातीच्या माठातील थंड पाणी पिण्यावर अधिक भर देतात. या पाण्याचे अनेक फायदेही सांगितले जातात. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे मातीच्या माठांना मागणी वाढली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर शहरातील चंद्रनगरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मागील नांदेड रोडवर याही वर्षी मातीच्या माठांची अनेक दुकाने थाटली आहेत. पुर्वी प्रमाणे आजघडीला लातूर शहरात कुंभार आणि कुंभाराच्या भट्ट्या नसल्या तरी माठ विक्रीचा व्यवसाय करणारे मात्र आहेत. लातूर जिल्ह्यातून मातीचे माठ आणुन येथे विक्रीस उपलब्ध करण्यात आलेले आहेत. काळ्या मातीच्या माठांना सर्वाधिक पसंती आहे. हे माठ ३०० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. माठ, रांजन, सुरई तसेच राजस्थानी लाल मातीचे माठ, सुरई बाजार पेठेत विक्रीस आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे या माठांना ब-यापैकी मागणी आहे.
माठातील पाणी पिण्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते, तसेच पचनास मदत होते. मातीतील नैसर्गिक प्रक्रियेमुळे हे पाणी फ्रिजपेक्षा जास्त थंड आणि आरोग्यदायी राहते. माठ नियमितपणे स्वच्छ करणे, पाणी रोज बदलणे आणि माठ झाकून ठेवणे आवश्यक आहे, असे सांगीतले जाते. माठ स्वच्छ करण्यासाठी फिटकरीचा वापर करणे आणि माठ ओलसर कापडाने गुंडाळणे हे उपाय पाणी थंड ठेवण्यासाठी केले जातात. माठातील पाणी पिणे हे फ्रिजच्या थंड पाण्यापेक्षा अधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित मानले जाते. या कारणांनी मातीच्या माठांना मागणी वाढली आहे.
फोटो: २

