वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
वाढत्या महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या.
सीएसएमटी परिसरात झालेल्या आंदोलनात पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘महागाई की मार नहीं चलेगी’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी भाज्या आणि धान्यांचे हार गळ्यात घालून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधले.

महागाईवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष घरगुती खर्चातील फरकावर प्रश्न उपस्थित केला. ‘फूड इन्फ्लेशन किती आहे, हा प्रश्नच आहे. तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई, बहीण किंवा पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे. घरातील खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आज प्रत्येक कुटुंबासमोर आहे,’’ असे सुळे म्हणाल्या. त्यांनी दूध, धान्य, भाज्या, कांदा, साखर यांसारख्या वस्तूंच्या किमतींचा उल्लेख करत सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले.

सकाळच्या नाश्त्यापासून ते घरातील रोजच्या स्वयंपाकापर्यंत महागाईचा परिणाम जाणवत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘‘दूध हा मूलभूत पदार्थ आहे. सकाळची सुरुवातच दुधापासून होते. मात्र, त्याचे दरही वाढले आहेत. सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम सरकार करत आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.

आनंदाचा शिधाही गायब
राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा उल्लेख करत सुळे यांनी सरकारवर टीका केली. निवडणुकीच्या काळात अनेक योजना आणि सवलतींची चर्चा होते; मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांची अंमलबजावणी किंवा सातत्य कुठे दिसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणुकांपुरत्या योजना
त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख केला. निवडणुकीनंतर मोठ्या संख्येने महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या महिलांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्या म्हणाल्या.

शेतक-यांना कर्जमाफीचा न्याय मिळाला का?’
महागाईचा प्रश्न केवळ शहरातील कुटुंबांपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतक-यांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे सुळे यांनी सांगितले. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. सरकारने कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला, मात्र प्रत्यक्षात अन्नधान्य पिकवणा-या शेतक-याला किती न्याय मिळाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मतदार यादीच्या मुद्यावरही सरकारला सवाल
आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळे यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेचाही मुद्दा उपस्थित केला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारांच्या नावांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर आपण स्वत: दररोज लक्ष ठेवत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

सोन्याच्या खरेदीवरून मोदींचा गोंधळात टाकणारा संदेश
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेतील वाढीबाबत सकारात्मक चित्र मांडले असताना दुसरीकडे सोन्याच्या खरेदीबाबत नागरिकांना वेगळा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले. देशाची अर्थव्यवस्था चांगली चालली असल्याचे सांगितले जात असेल, तर सोन्याच्या खरेदीबाबत वेगळी भूमिका का घेतली जाते, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारकडून ‘गोंधळात टाकणारे संकेत’ दिले जात असल्याची टीका केली.

महागाई कमी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
सीएसएमटी परिसरातील आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महागाईचा मुद्दा पुन्हा आक्रमकपणे पुढे आणला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, शेतक-यांची आर्थिक परिस्थिती, महिलांवरील आर्थिक भार आणि सरकारी योजनांबाबतचे प्रश्न या मुद्यांना पक्षाने आंदोलनाच्या केंद्रस्थानी ठेवले. महागाई कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news