वायूसेनेच्या ताफ्यात २ तेजस मार्क-१ दाखल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय वायूसेनेला सप्टेंबर महिन्यात २ तेजस मार्क-१ ए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय वायूसेनेला २ तेजस मार्क-१ ए लढावू विमाने देऊ शकते, असे भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी सांगितले. या विमानांना वेपन्स इंटीग्रेशन म्हणजे शस्त्रास्त्रे जोडण्यात आली आहेत.

यावेळी आर. के. सिंह यांनी सांगितले की, सरकार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) बरोबर ९७ आणखी तेजस खरेदी करण्याचा करार करणार आहे. ज्याची अंदाजित किंमत ६७ हजार कोटी रुपये आहे. सध्या ३८ तेजस जेट फायटर विमाने वायूसेनेत सामील आहेत.केंद्र सरकारने १९ ऑगस्ट रोजी भारतीय वायूसेनेसाठी ९७ तेजस मार्क-१ ए फायटर जेट खरेदी करण्यासाठी ६७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. वास्तविक फेब्रुवारी २०२१ मध्ये सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.सोबत ८३ तेजस मार्क-१ ए खरेदीसाठी ४८ हजार कोटींचा करार केलेला होता. परंतु हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.ने अमेरिकन इंजिन डीलिव्हरी होण्यास उशीर झाल्याने आतापर्यंत एकही विमान सोपवलेले नाही. परंतु आशा निर्माण झाली आहे की, २०२८ पर्यंत हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. सर्व विमाने वायूसेनेला सोपवणार आहे

. एलएसी मार्क-१ ए तेजस एअरक्राफ्टचे एडव्हान्स व्हर्जन आहे. या अपग्रेडेड एव्हियॉनिक्स आणि रडार सिस्टीम लावलेली आहे. एलएसी मार्क-१ एचे ६५ टक्के उपकरणे भारतात तयार झालेली आहेत. तेजसलादेखील हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे. एचएएलच्या जवळ ८३ एअरक्राफ्ट्सची डीलिव्हरी करण्यासाठी २०२८ पर्यंतचा वेळ आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे चेअरमन आणि मॅनेजमेंट संचालक डी. के. सुनील यांनी सांगितले की, डिलिव्हरीला झालेल्या उशिराबद्दल इंडस्ट्रीला जबाबदार धरले जात होते. परंतु या दिरंगाईला तांत्रिक त्रुटी जबाबदार आहे. यास आता दूर केले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news