लातूर : प्रतिनिधी
खंडापूर येथे वारक-यांचा जणू कुंभमेळाच भरला आहे. वारक-यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वारक-यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरानजीकच्या खंडापूर परिसरात आयोजित भव्य,दिव्य सत्संग सोहळ्यास दिलेल्या भेटी प्रसंगी केले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी लातूर शहरानजीकच्या खंडापूर परिसरात आयोजित भव्य, दिव्य सत्संग सोहळ्यास उपस्थित राहून ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे कीर्तन सेवेचा लाभ घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. श्री संत नामदेव महाराज षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सांगता सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सांगता महोत्सव, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने, लातूर तालुक्यातील खंडापूर परिसरात २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान वारक-यांचा सत्संगसोहळा होत आहे.
यावेळी खा. डॉ. शिवाजी काळगे, श्री गुरु माणिक महाराज देहूकर, श्री गुरु रामदास महाराज मोरे देहूकर, बाबा महाराज काडगावकर, प्रभू महाराज माळी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, ट्वेंटीवन शुगरचे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख, सोनाली थोरमोठे पाटील, दत्ता टेकाळे, गुरुनाथ गवळी, अक्षय देशमुख, शाम बरुरे, तात्यासाहेब देशमुख, विकास देशमुख, बाळासाहेब कदम, सतीश साळुंखे, विकास कांबळे, चंद्रकांत अरडले, संजय पाटील खंडापूरकर, बालाजी वाघमारे, विष्णू धायगुडे, रामभाऊ कोंबडे, पंडितराव लखनगिरे, रवींद्र मुहकुळे, तुषार लखनगिरे, महेश चामे, परमेश्वर मांडवे, माऊली सुडे, चंद्रकांत टेकाळे, हनुमंत पवार, वीरसेन भोसले, नरेश पवार आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर तालुक्यातील खंडापूर येथे वारक-यांचा कुंभमेळा होतोय, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे हार्दिक स्वागत करतो. वारक-यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू वारक-यांनीही आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांनी सांगितले.

