वाहनांवरील पांढ-या एलईडी लाईट विरोधात आंदोलनाचा इशारा; महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच आरटीओ अधिका-यांना निवेदन

ताडकळस : सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांवर बसविण्यात येणा-या प्रखर पांढ-या एलईडी लाईटमुळे रात्रीच्या वेळी समोरून येणा-या वाहनचालकांना प्रखर प्रकाशाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रखर प्रकाशामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनांवरील पांढ-या एलईडी लाईटचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा. तसेच संबंधित विभागाने अशा वाहनांची तपासणी करून नियमबा पांढ-या एलईडी लाईटचा वापर करणा-यावर वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष नाना तुपे यांच्या नेतृत्वाखाली दि. ३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाहनांसमोर बसविण्यात येणा-या प्रखर पांढ-या एलईडी लाईटमुळे समोरून येणा-या वाहन चालकांना प्रखर प्रकाशामुळे काहीच दिसत नाही.

विशेषत: रात्रीच्या वेळी या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडत असल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा पांढ-या एलईडी लाईटचा वापर करणा-या वाहनांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना तुपे, मनसे सैनिक प्रमोद सूर्यवंशी, रमेश्वर फाळके उपस्थित होते. वाहनचालकांची सुरक्षितता आणि अपघातांना आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग कितपत दखल घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news