लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी मुसंडी मारलेली आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून आज काँग्रेस २३ जागा जिंकून पुढे आलेला आहे. जिल्ह्यातील चार ते पाच जागा काँग्रेसच्या थोड्या मताने पराभूत झालेल्या असून आजचा काँग्रेसचा विजय हा सत्ताधारी पक्षावर असलेल्या नाराजीचा सुर आहे. काँग्रेसने सर्वधर्म समभाव हा विचार ठेवून विकासाची दृष्टी ठेवून कार्य केले ही निवडणूक राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, माजी आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरात प्रचार सभा घेतल्या शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले सरकारची भूमिका कामाबद्दल लोकांत मोठी नाराजी होती. काँग्रेसच्या सभांना मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता मतदारांनी आजच्या निकालावरून काँग्रेसला भरभरून आशीर्वाद दिला आहे हे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून आगामी काळात काँग्रेस जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असल्याचे राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे

