पाटणा : वृत्तसंस्था
बिहारची राजधानी पाटणात विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकले आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने काढलेल्या मार्चने राजकीय वातावरण तापले. मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ७० वी इढरउ परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी जमले होते. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे.
विद्यार्थी आंदोलकांनी प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली आहे. त्याच शिक्षण विभागाचे मुख्य सचिव आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. पाटण्यातील गर्दनीबागमध्ये अनेक विद्यार्थी संघटना आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाला जवळपास १३-१४ संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेराव घालण्याच्या मागणीला आरजेडीकडूनही पाठिंबा मिळाला आहे. पाटण्यात ७० ‘बीपीएससी’ परीक्षा पुन्हा घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी नकारात्मक गुणपद्धती रद्द करणे आणि भरती प्रक्रियेत एकच परीक्षा पद्धत लागू करणे अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी गांधी मैदानापासून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या दिशेने मोर्चा काढला.
विद्यार्थी आक्रमक, पोलिस प्रशासन अलर्ट
मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिस आक्रमक विद्यार्थ्यांना रोखण्याची मागणी करत आहेत. तर आंदोलक विद्यार्थी मागण्यांवर ठाम आहेत. भरती परीक्षेत सुधारणांची गरज असल्याची आंदोलकांची मागणी आहे.
















