लातूर : प्रतिनिधी
जागतिक हृदय दिनानिमित्त येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व हेल्थ केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जाणुन घेतले हृदयाची रचना, हृदयाचे कार्य.
याप्रसंगी हेल्थ केअर सेंटरची वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती फेरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गवळी, डॉ. राहुल मोरे आणि विद्यार्थी स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या विशेष आरोग्य तपासणीमध्ये विद्यार्थ्यांचे रक्तदाब मोजण्यात आले. तसेच त्यांना हृदयाची रचना, हृदयाचे कार्य, हृदयाशी संबंधित होणारे विविध आजार, हृदय रोगांशी निगडित सर्व उपचार याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी स्वत:चा हार्ट रेट कसा मोजावा, नॉर्मल हार्ट रेट किती असतो, सीपीआर देण्याची गरज केव्हा पडू शकते व तो कसा द्यावा याचेही मार्गदर्शन ही हेल्थ केअर सेंटर ची वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती फेरे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्याण सावंत, डॉ. प्रकाश रोडिया, प्रा. विजय गवळी, डॉ. राहुल मोरे, प्रा. जयश्री जाधव, प्रा. चंद्रप्रभा कुलकर्णी आणि विद्यार्थी स्वयंसेवक कु. सरवदे भक्ती, पारवे निकिता, कांबळे रागिनी, शिंदे अनन्या, सुर्यवंशी प्रांजली, वळगे श्रद्धा, रसाळ आश्रत, साळुंके चंद्रशेखर, आदमाने प्रेम यांनी सदर शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

