विनोद कांबळीला ‘देव’ करणार मदत

मुंबई : प्रतिनिधी
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती सध्या चांगली नसल्याचे सर्वांच्या समोर आले आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हीडीओही व्हायरल झाला होता, ज्यात विनोद कांबळी आपला सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकरसोबत हातमिळवणी करत होता. अशा स्थितीत आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव हे कांबळीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नुकताच महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात उपस्थित होता. या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा झाली. याच कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन मित्रांची भेटही झाली. या भेटीमुळेच हा कार्यक्रम प्रचंड चर्चेत आला.

विनोद कांबळीचे निकटवर्तीय असलेले माजी प्रथम श्रेणी क्रिकेट पंच मार्कस काउटो यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, कांबळीच्या आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत. कांबळी यापूर्वी १४ वेळा रिहॅब सेंटरमध्ये गेला आहे. तीन वेळा आम्ही त्याला वसईच्या रिहॅब सेंटरमध्ये नेले आहे. ऑगस्टमध्ये त्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर काउटो आणि त्यांचा भाऊ रिकीसोबत कांबळीची त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली आणि माजी क्रिकेटपटूच्या तब्येतीबद्दल आणि अमली पदार्थांच्या व्यसनाशी सुरू असलेल्या लढाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

याच दरम्यान आता कांबळीला आता अनपेक्षितपणे भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा मदतीचा हात मिळाला आहे. दारूच्या व्यसनामुळे कांबळीचे अनेक सहकारी आणि मित्र त्याच्यापासून दूर गेले. पण कपिल देव आणि १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तथापि, यामध्ये एक महत्त्वाची अट अशी आहे, की ठीक होण्यासाठी कांबळीला पहिले पाऊल टाकावे लागणार आहे.

माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू म्हणाले की, कपिल देव यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे, की जर त्याला पुनर्वसनात जायचे असेल तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत.

मात्र, सर्वांत आधी त्याने स्वत:च्या इच्छेने रिहॅब सेंटरमध्ये जायला हवे. जर त्याने तसे केले तर उपचार कितीही काळ चालले तरी आम्ही बिल भरायला तयार आहोत. कपिल देव यांनी यापूर्वीही आपल्या सहका-यांना किंवा माजी क्रिकेटपटूंना मदत केली आहे. ताजे प्रकरण अंशुमन गायकवाडशी संबंधित आहे, पण त्यांनी कॅन्सरमुळे या जगाचा निरोप घेतला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news