22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeक्रीडाविराट कोहली वनडेचा किंग; द. अफ्रिकेविरुद्ध विराटचे सलग दुसरे शतक

विराट कोहली वनडेचा किंग; द. अफ्रिकेविरुद्ध विराटचे सलग दुसरे शतक

रायपूर : वृत्तसंस्था
रांची वनडे सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी धमाका केला आहे. रायपूर वनडे सामन्यात विराट कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं. त्याच्या या शतकीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. विराट कोहलीने वनडेतील ५३ वे आणि आंतरराष्ट्रीय ८४ वे शतक ठोकले आहे.

विराट कोहलीने ९० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १११.११ चा होता. विराट कोहलीने तिस-या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसोबत १९५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला २५० पार धावा करता आल्या.

विराट कोहलीने आता सलग दोन किंवा अधिक वनडे डावांमध्ये ११ वेगवेगळ्या शतकांच्या मालिका ठोकल्या आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो. त्याने सहा शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने ८३ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकार मारत १०५ धावा केल्या.

विराट कोहलीने रायपूर वनडेमध्ये षटकार मारून आपले खाते उघडले, विराट कोहलीने षटकार मारून वनडे सामन्यात आपले खाते उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा विराट कोहली एकेरी, दुहेरी किंवा चौकारांनी आपले खाते उघडतो.

विराट कोहलीने शतकासोबत न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनी दक्षिण अफ्रिकेविरूद्ध वनडेत तीन शतकं ठोकली आहेत. वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद १-०, रांची वनडे २०२५ सामन्यात १३५ आणि रायपूर वनडे २०२५ सामन्यात १०५ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR