20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeलातूरविलासरावांनीच लातूरच्या विकासाची घडी बसवली 

विलासरावांनीच लातूरच्या विकासाची घडी बसवली 

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांनीच लातूरच्या विकासाची घडी बसवली. त्याला लातूरकरांनी भरभरुन साथ दिल्यामुळेच लातूरच्या विकासाची घडी विस्कटली नाही. आज माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख लातूरकरांच्या प्रचंड पाठींब्याच्या बळावरच लातूरच्या विकासाचा रथ समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. देशमुख कुटूंबिय लातूरकरांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात कधीही कमी पडणार नाहीत, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
ज्वेलरीमध्ये अल्पावधीत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करणा-या येथील माऊली ज्वेलर्सच्या वतीने आयोजित श्रावण गौरी-गणपती महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. प्रारंभी चेअरमन व्ही. पी. पाटील, संचालिका सौ. चंद्रकला व्यंकटराव पाटील आणि पाटील कुटूूंबियांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, लातूरमध्ये जे जे नवं ते ते हवं, हे ब्रिद विकासरत्न विलासराव देशमुख यांचे आहे. त्यानूसार लातूरमध्ये येत असलेले नवनवीन उद्योग, व्यवसाय, फर्म यांचे त्यांनी स्वागत करुन उद्योग, व्यवसायात येणा-या प्रत्येकांना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच लातूरचा चौफेर विकास झालेला दिसून येत आहे. व्ही. पी. पाटील यांनी माऊली ज्वेलर्सच्या माध्यमातून श्रावण गौरी-गणपती महोत्सवाचा सुरु केला आहे. त्यास ग्राहक भरभरुन प्रतिसाद देतील, असे आशिर्वाद दिले.
प्रास्ताविक करताना चेअरमन व्ही. पी. पाटील यांनी माऊली ज्वेलर्सची वाटचाल नमुद करुन विकासरत्न विलासराव देशमुख व श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच व्यवसायात यशस्वी झालो. माझ्या प्रत्येक उपक्रमाला विकासरत्न विलासराव देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी खुप मोठे सहकार्य केले. या दोघांच्या रुपाने मला माझ्या आयुष्यात गॉड फादर आणि गॉड मदरही मिळाली. त्यांच्या पावण स्पर्शाने माझे जीवन बदलून गेले, असे सांगीतले.
यावेळी डॉ. सारीका देशमुख, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. सांगळे, महादेव साबदे, कासले, डॉ. हंडरगुळे, कलंत्री, बलदवा, आर. बी. माने, विजय पाटील, अनिल शिंदे, आशिष व्यंकटराव पाटील, किरण आशिष पाटील, सौ. अश्विनी धिरज शिंदे, धिरज गोकूळ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्राहक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR