Homeलातूरविलासराव देशमुख फाऊंडेशनच्या मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, लातूर येथे दि. २५ एप्रिल रोजी पालक-शिक्षक-विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेत करण्यात आला.   महाविद्यालयातील विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेश शिंद होते. या वेळी सर्व विभागप्रमुख, व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथम वर्ष समन्वयक डॉ. मुंढे अश्विनकुमार यांनी केले.  प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी डॉ. काकडे संदीप यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. या मेळाव्यासाठी पालक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वर्तन आणि भविष्यातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रम, प्लेसमेंट सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहितीही देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR