21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeलातूरविविध मूलभूत सुविधांसाठी मुख्याधिका-यांना घेराव

विविध मूलभूत सुविधांसाठी मुख्याधिका-यांना घेराव

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहरातील हैदरीया नगर, छत्रपती शिवाजी नगर भागात तत्काळ मुरूम टाकण्यात यावे व औरंगपुरा, जामबाग भागातील कामे तत्काळ करण्यात यावीत या मागणीसाठी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
     निलंगा शहरातील हैदरिया नगर, छत्रपती शिवाजी नगर तसेच औरंगपुरा भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक वेळा निवेदने देण्यात आली. आंदोलन ही करण्यात आली संपूर्ण पावसाळा संपत आला तरी मुरूम टाकण्यात आले नाही. अद्याप पूर्ण मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून विविध मागण्या घेऊन संबंधित भागातील नागरिकांनी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांच्या दालनात घेराव घालून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले . या मागण्या आठ दिवसात पूर्ण नाही झाल्यास येणा-या दि २३ सप्टेंबर रोजीपासून निलंगा नगरपालिके समोर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर, निलोफर नजाद, साजिदा शेख, सुरय्या सय्यद, ताईमिन पटेल, रीहाना पठाण, दिपाली चव्हाण, रीफाना सय्यद, बिस्मील्लाबी खातून, मुन्नाबी शेख आदी महीलासह सलीम हाश्मी, नुरोदीन शेख, जमीर सय्यद, गौस पठाण, महेमुद शेख,यासीन मणियार,समीर सय्यद, गौस सय्यद, महेमुद् झारेकर, मुस्तफा झारेकर,फरीद शेख, इम्रान बागवान, शम्मु बागवान, मौला शेख, इस्माईल बागवान, खालील सौदागर आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR