पुण्यात धक्कादायक घटना
पुणे : पिंपरी-चिंचवड भागातील फुगेवाडी परिसरात एकाच भागात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी ७ जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली. फुगेवाडीतील गावच्या आझाद चौकात एका फलकावर या मृतांची नावे लिहिल्यानंतर परिसरातील लोकांना या घटनेसंदर्भात माहिती कळाली. हे मृत्यू अवैध हातभट्टीच्या दारुमुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
गावच्या आझाद चौक आणि परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीची दारु आणि गावठी दारुचे अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे. येथील विषारी दारूमुळे ७ नागरिकांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. आता या हातभट्टीच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे.
















