26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयवीज, पाण्यासाठी जेन-झेडच्या आंदोलनामुळे सरकार विसर्जित

वीज, पाण्यासाठी जेन-झेडच्या आंदोलनामुळे सरकार विसर्जित

 

अ‍ॅँटानानरिवो : वृत्तसंस्था
नेपाळपाठोपाठ, आफ्रिकन देश मादागास्करमध्ये मादागास्करमधील तरुणांनीही पाणी आणि वीज टंचाईचे कारण देत सरकारवर हल्ला केला. लष्करानेही निदर्शकांना पाठिंबा दिला, यामुळे राष्ट्राध्यक्ष अँड्री यांच्या समस्या आणखी वाढल्या. मोठ्या संख्येने जेन-झेड रस्त्यावर उतरली आणि निदर्शने सुरू केली. पाण्याच्या कमतरतेमुळे तरुण संतापले. त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला. दरम्यान, मादागास्करचे अध्यक्ष आंद्रे राजोएलिना यांनी सरकार विसर्जित केले असून स्वत: देश सोडून परागंदा झाले आहेत.

मादागास्करमधील विरोधी पक्षनेते, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेपाळनंतर दुस-यांदा जेन-झेड यांना सत्ता परिवर्तनाची सुरुवात करण्यात यश आले आहे. मादागास्करचे विरोधी पक्षनेते सिटेनी यांनी सांगितले की, रविवारी एक लष्करी तुकडी जेन-झेड निदर्शकांमध्ये सामील झाली, यामुळे अध्यक्ष अँड्री यांना देश सोडावा लागला.

सिटेनी यांच्या मते, राष्ट्राध्यक्षांच्या जाण्याची माहिती मिळाल्यानंतर, आम्ही राष्ट्राध्यक्ष भवनमधील कर्मचा-यांना बोलावले. अँड्री कोणालाही न कळवता देश सोडून पळून गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष भवनने अद्याप या प्रकरणावर औपचारिक निवेदन जारी केलेले नाही. राष्ट्राध्यक्ष अँड्री फ्रेंच लष्करी विमानाने देश सोडून पळून गेले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की त्यांच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR