22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूरवैद्यकीय अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी

वैद्यकीय अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी

निलंगा : प्रतिनिधी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी बिराजदार हे रुग्णांसोबत तसेच कर्तव्यावरील कर्मचा-यांशी अरेरावी करीत आहेत, असा आरोपी करीत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा छावाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष तुळशीदास सोळुंके यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नियोजनाद्वारे दिला आहे .
    निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी बिराजदार हे अनेक रुग्णांसोबत उद्धट वागत गैरवर्तन करीत कर्मचा-यांशी अरेरावीची भाषा वापरल्याच्या तक्रारी आहेत . तसेच पोलीस कर्मचा-यांशी उद्धट वर्तन करून दि. १० जून रोजी त्रास दिला सदर निलंगा पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचा-यांनी एका महिला आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले होते. त्या वेळी डॉ. बिराजदार यांनी या महिला पोलीस कर्मचा-याशी अत्यंत उद्धटपणे, अवमानकारक शब्दांत संवाद साधला व त्यांच्याशी अशोभनीय गैरवर्तन केल्याची तक्रार पोलीस विभागाकडून वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे देण्यात आली आहे. ही घटना म्हणजे केवळ शासकीय सेवक म्हणून असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन नाही, तर महिलांप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे.
डॉ. बिराजदार यांची संपूर्ण शासकीय सेवा तपासून ते शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून कोणत्या ठिकाणी नेमणूक झाली व कार्यकाळ किती होता. त्यांनी संबंधित सेवास्थळांवर कामाची कार्यपद्धती कशी ठेवली व त्यांच्या वर्तणुकीबाबत कोणकोणत्या तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यावर काय कारवाई झाली?, एकूण किती दिवस नियमित सेवा बजावली आणि किती दिवस गैरहजर होते. याची सखोल चौकशी करून, दोषी असल्यास त्यांच्या विरोधात वैतनिक स्थगन, कार्यक्षमतेचा अहवाल, किंवा सेवेतून बडतर्फी अशा प्रकारची तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने या अन्यायकारक वर्तनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास सोळुंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR