29.1 C
Latur
Tuesday, February 17, 2026
Homeमहाराष्ट्र‘वैष्णवी’ प्रकरणातील फरार निलेश चव्हाण अटकेत

‘वैष्णवी’ प्रकरणातील फरार निलेश चव्हाण अटकेत

नेपाळ बॉर्डरवरून घेतले ताब्यात

पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या १० दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होती. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे.

पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा अटक होण्याआधीच फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. या पथकांकडून विविध ठिकाणी तपास केला जात होता.

अखेर बंदूकधारी निलेश चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तो २१ मे पासून फरार होता. अखेर १० दिवसांनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून तो नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

करिष्मा हगवणेचा मित्र
निलेश चव्हाण याचा बांधकाम व्यवसाय असून, तो पोकलेन मशिनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. तो शशांक हगवणेची बहीण करिष्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. निलेश चव्हाण याच्याविरुद्ध १४ जून २०२२ रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR