शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!

कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील करत आहेत.

शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली राबवला जात असला तरी प्रत्यक्षात इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारणीसाठी शेतक-यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावात हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा डाव उधळून लावण्यासाठीच कोल्हापुरातील शेतकरी एकवटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या मते, शक्तिपीठ महामार्गामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा वेगवान दळणवळण मार्ग तयार होणार आहे. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मात्र विरोधक आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या मते, प्रकल्पामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असून अनेक शेतकरी कुटुंबांचे विस्थापन होऊ शकते.

या आंदोलनामुळे शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा आता केवळ शेतकरी आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध स्थानिक संघटना या मुद्यावर एकत्र आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हा विषय राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.

७८ गावांचा वाढता विरोध
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गातील अनेक गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र नाराजी आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यापूर्वी ७८ गावांतील शेतक-यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. आजच्या आंदोलनातही या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणावरूनही वाद
महामार्गाच्या सर्वेक्षण प्रक्रियेवरूनही वाद निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये मोजणीसाठी गेलेल्या पथकांना ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. माळशिरससह काही भागांत मोजणीपूर्वी शेतक-यांना ताब्यात घेतल्याच्या घटनांमुळे आंदोलनाला अधिक धार मिळाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news