शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात राजकीय संघर्ष पेटला

कोल्हापूर : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावरून कोल्हापुरातील राजकारण चांगलेच तापले आहे. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी मोजणी सुरू केल्यास अधिका-यांना ‘चोपून काढू’ असा इशारा दिल्याने या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोधाची धार वाढत असताना या प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात राजकीय नेत्यांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यानंतर आता करवीरचे शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनीही महामार्गाला विरोध दर्शवला आहे. मात्र, महायुतीतीलच आमदाराने प्रकल्पाला विरोध केल्याने राजेश क्षीरसागर यांनी नरके यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरकारच्या योजनांना विरोध करू नका
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतक-यांच्या जमिनीची मोजणी करण्यास विरोध करताना राजू शेट्टी यांनी अधिका-यांना चोपून काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्तेचा लाभ घेऊन सरकारच्या योजनांना विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. क्षीरसागर यांच्या या वक्तव्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नाला आता केवळ शेतकरी विरुद्ध सरकार असे स्वरूप न राहता महायुतीतील अंतर्गत मतभेदांचाही रंग चढताना दिसत आहे.

नरकेंच्या भूमिकेवर क्षीरसागरांचा सवाल
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणा-या आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. करवीर मतदारसंघातील शेतक-यांच्या भावना लक्षात घेऊन नरके यांनी महामार्गाला विरोध केला आहे. मात्र, महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारानेच सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध केल्याने क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली.

एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूकही आता चर्चेत आली आहे. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले.

मंत्रिपदाबाबत क्षीरसागरांची खंत
या सर्व राजकीय मुद्यांसोबतच राजेश क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीतील नाराजीही उघडपणे व्यक्त केली. तब्बल ४० वर्षे पक्षासाठी काम करूनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडताना संपूर्ण संघटना घेऊन आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news