27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खोकल्याचा आणि कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे शरद पवार यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले पाच ते सहा दिवस शरद पवारांवर उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती चांगली झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

तर शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. रुबी हॉल रुग्णालयाकडून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवारांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे आणि ते बरे झाले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर घरी नेण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. रुग्णालयातून खाली आल्यानंतर शरद पवारांनी सगळ्यांना खाली येऊन व्हील चेअरवर हात दाखवला, त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले, आता घरामध्ये त्यांना चार ते पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR