Homeमहाराष्ट्रशहरातली लहान मुले गुदमरतायत

शहरातली लहान मुले गुदमरतायत

वाढत्या प्रदूषणावर दीपिका पदुकोणची पोस्ट

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच, दीपिका पदुकोण सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. आधी दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली. आणि याच मागणीमुळे दीपिका ट्रोल झाली. अशातच सध्या दीपिकाची इन्स्टा स्टोरी चर्चेत आहे. दीपिका पदुकोणने मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत एक पोस्ट केली आहे. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे शहरातले रहिवासी आणि लहान मुलांना श्वास घ्यायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक ‘स्टोरी’ शेअर केली, ज्यामध्ये तिने मुंबईतील प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. तसेच, तिने महापालिका अधिका-यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईतील हवेचा निर्देशांक १५० च्या वर गेल्याचे दिसून आले. हा एक्यूआय आरोग्यासाठी हानीकारक असतो.

दीपिकाने मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीचा एक ‘स्क्रीनशॉट’ शेअर केला आहे. या फोटोसोबतच, तिने शहराची महापालिका, अर्थात ‘बीएमसी’ ला टॅग केले आहे. अधिका-यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. मुंबईत राहणारे लोक विशेषत: लहान मुलं, हवेची गुणवत्ता खालावत असल्यामुळे गुदमरत आहेत. त्यासोबतच ‘हे कसं योग्य असू शकतं?’, असा प्रश्नही दीपिकाने उपस्थित केला आहे. दीपिका पदुकोणपूर्वी रिचा चढ्ढा आणि सयामी खेर या अभिनेत्रींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून मुंबईच्या दिवसेंदिवस खालावणा-या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR