लातूर : आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी वासवी देवी जयंतीनिमित्त लातूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आर्य वैश्य युथ संघटनेने येथील विलासराव देशमुख शासकीयक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना खिचडी केली.
आर्य वैश्य समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मिरवणुकीत आकर्षक रथावर माता वासवी देवींची सुंदर प्रतिमा सजवण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी आणि युवकांनी सहभाग घेतला तसेच ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य समाजाच्या पदाधिका-यांनी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. मिरवणूकीनंतर नगरेश्वर मंदिरात वासवी देवीची आरती झाली व त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशवसतेसाठी सोमनाथ बोरलेपवार, संगम कोटलवार, संजय पंपटवार, आर्य वैशय समाज अध्यक्ष दीपक हरी कोटलवार, सचिव सुनील बालाजी बच्चेवार, उषा चंद्रकांत बट्टेवार विठ्ठल तगडपल्लेवार यांनी सहकार्य केले.

